रमाई आवास (घरकूल) योजना

रमाई आवास (घरकूल) योजना :

अनुसूचित जातींमधील जे दिव्यांग लाभार्थी दारिद्रय रेषेखाली नाहीत, ज्याचे दिव्यांगत्व ४०% पेक्षा अधिक आहे व वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे, अशा दिव्यांग लाभार्थ्यांना, ते योजनेच्या उर्वरित अटी व शर्तीची पूर्तता करीत असल्यास त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय. 

संपर्क : संबंधित जिल्ह्याचे सहाय्य आयुक्त, समाज कल्याण / जिल्हाधिकारी /मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद /आयुक्त महानगरपालिका (संबंधित)

- समाजकल्याण विभाग मुंबई शहर यांचे माहिती पत्रक 

- रमाई आवास घरकुल योजना शासन निर्णय क्र. रआयो-२०१५/प्र.क्र.४२०/बांधकामे दिनांक ३१ डिसेंबर, २०१५