मानसिक विकलांग (मनोरुग्ण), सेरेब्रल पाल्सी आणि आत्ममग्न (ऑटीझम) अशा दिव्यांगांसाठी स्वयंरोजगार योजना

कर्ज मर्यादा : रुपये १० लाख
कर्ज देताना त्यासाठी करावा लागणारा कायदेशीर करार हा मनोरुग्ण व्यक्तीबरोबर करता येत नसल्यामुळे त्यांना खालील व्याक्तीमार्फात कर्ज मिळवता येईल.
  • मनोरुग्णाचे आई-वडील
  • मनोरुग्णाचे सहचर (पती अथवा पत्नी)
  • कायदेशीर पालक

कर्ज मागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्र

  • मूळ विहित नमुन्यातील अर्ज पूर्णतया भरलेला असावा
  • १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्या बाबतचा दाखला / डोमिसाईल सर्टीफिकेट
  • वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे)
  • दिव्यांगत्वाचा दाखला (साक्षांकित केलेली सत्यप्रत)
  • निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत /आधार कार्ड /पॅन कार्ड किंवा दिव्यांग ओळखपत्र
  • पासपोर्ट साईज व पूर्ण आकाराचा फोटो (अर्जावर चिकटवण्यात यावेत)
  • जागेच्या उपलब्धतेचा पुरावा (जागा स्वत:ची असल्यास कर पावती, नातेवाईकाची असल्यास संमतीपत्र, भाड्याची असल्यास भाडे करार नामा )
  • कर्जबाजारी/ वित्त संस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र (रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवर)
  • व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल रु.३ लाख पर्यंत लाभार्थ्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेला चालेल
  • दरपत्रक
  • मतीमंद सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम अर्जदाराबाबत पालकत्वाचा दाखला
  • मतीमंद सेरेब्रल पाल्सी/ ऑटिझम अर्जदाराकरिता जिल्हा लोकल लेव्हल कमिटी द्वारा प्रमाणित केलेला कायदेशीर पालकत्वाचा दाखला, मतीमंद व्यक्तीसह कुटुंबाचा एकत्रित फोटो ३
  • मतीमंद अर्जदाराच्या बाबतीत अर्जावर पालकांची (Legal Guardian) सही असणे आवश्यक आहे

वैधानिक कागदपत्र

नमुना क्र.

१. स्थळपाहणी

२. जमीनदार वैयक्तिक माहिती

३. पैसे दिल्याची पावती

४. डी.पी. नोट

५. प्रतिज्ञापत्र (लाभार्थींच्या नावे १००/- रु.च्या स्टॅम्प पेपरवर )

६. जामीन करारनामा (१००/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)

७. तारण करारनामा ( १०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)