दिव्यांगांच्या कल्याणासाठी आता चीनचा आधार

महाराष्ट्र टाईम्स
९ नोव्हेंबर २०११
पुणे, भारत

दिव्यांग व दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांसाठी राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत १० दिवसांचा चीन दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौ-यादरम्यान बीजिंग, शांघाय, शेनझेन, हाँगकाँग आदी शहरांना भेट देण्यात येणार आहे.

दिव्यांगांसाठी २००८ मध्ये अशाच प्रकारच्या युरोप अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात २५ संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे यांनी दिली.

दिव्यांगांसाठी चीनमध्ये कोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात, याची पाहणी या दौ-यादरम्यान करण्यात येणार आहे. तसेच, त्या धतीर्वर भारतामध्ये सुविधा कशा मिळवून देता येतील, याचाही अहवाल तयार केला जाणार आहे.

या दौऱ्यात दिव्यांग, त्यांचे सहायक, दिव्यांगांसाठी कार्य करणा-या संस्थांचे पदाधिकारी सहभागी होऊ शकतात. या दौ-यात सहभागी होऊ इच्छिणारे दिव्यांग, दिव्यांग संस्थाचालक, पदाधिकारी व शासकीय अधिका - यांच्या उपस्थितीत १६ नोव्हेंबरला मुंबईतील वांदे येथील म्हाडाच्या इमारतीमध्ये महिला आथिर्क विकास महामंडळाच्या सभागृहात दुपारी अडीच वाजता बैठक होणार आहे.