मतीमंद व्यक्तींच्या पालकांचा संस्थांसाठी आर्थिक सहाय्य योजना

प्रकल्प मर्यादा: कमाल रुपये ५ लाख पर्यंत
अशासकीय संस्थेचा सहभाग: प्रकल्प किंमतीच्या ५ %
पालक संस्थेची नोंदणी निदान ३ वर्षे आवश्यक
कर्ज परत फेडीचा कालावधी: १० वर्षे
सुरक्षा: एकूण मंजूर रकमेच्या २५% रक्कम एन.एच.एफ.डी.सी.च्या नावे
मुदत ठेव स्वरुपात तारण किंवा ४०% रक्कम साम्पश्विक (Collateral)
संस्थेमध्ये कमीत कमी ५ सभासद आवश्यक
वार्षिक व्याजाचे दर: रुपये ५००००/- पर्यंत ५%
रुपये ५००००/-ते रुपये ५ लाखा पर्यंत ६%
  • पालक संस्था तीन वर्षापूर्वी अधिकृतरित्या नोंदणीकृत असावी
  • संस्थेत कमीतकमी ५ पालकांचे कार्यकारी सदस्यत्व असावे
  • संस्था कोणत्याही केंद्र शासन, राज्य शासन, वित्तीय संस्थान बँक यांच्या द्वारे वित्तीय क्षेत्रात बहिष्कृत नसावी

कर्ज मागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला कर्ज मागणी अर्ज (रु. ५ लाखापर्यंत २ प्रती व त्यावरील प्रकरण
    असल्यास ३ प्रती )
  • संस्था नोंदणी प्रमाणपत्र
  • संस्था निवेदन (मॅमोरॅन्डाम)
  • संस्थाचे उद्देश
  • कार्यकारी सभासद यादी
  • आमसभा ठराव (बैठक क्र.)
  • मागील तीन वर्षात संस्थेद्वारा दिव्यांगांसाठी केलेल्या कार्याचा तपशील अहवाल
  • कोणत्याही वित्तीय संस्थान/ राज्य किंवा राष्ट्रीय सरकार मान्य संस्थान/ अंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थान कडून घेतलेल्या अर्थ सहाय्य बाबत माहिती
  • संस्थाद्वारे कर्ज स्वरुपात अर्थ सहाय्य पुरवठा करण्यात येणाऱ्या लाभार्थींची यादीत नमूद विषय, नाव, पत्ता, वय, जात, दिव्यांग टक्केवारी, ग्रामीण किंवा शहरी वार्षिक उत्पन्न, व्यवसायाचा तपशील, लाभार्थिद्वारा मागणी केलेली रक्कम
  • संस्थेचा मागील तीन वर्षाचा अधिकृत लेखा अहवाल
  • संस्थेचे पॅन कार्ड, बँक खाते, पासबुक, जागेबाबतचे कागदपत्र यांचे साक्षांकित सत्यप्रत

टीप:-

वैधानिक कागदपत्रांची पूर्तता नियमानुसार करावी लागेल.