दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी/ हॉरटीकल्चर योजना

प्रकल्प मर्यादा: रुपये १० लाख पर्यंत
लाभार्थींचा सहभाग: ५%
राज्य महामंडळाचा सहभाग: ५%
राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग: ९०%
वार्षिक व्याजदर:
रुपये ५ लाखापर्यंत
पुरुषांसाठी ६%
महिलांसाठी ५%
रुपये ५ लाखांच्या पुढे: ७%
कर्ज परत फेडीचा कालावधी: ५ वर्षे
मंजुरी अधिकार: ५ लक्ष पर्यंत म.रा.अं.वि.महा.मुंबई व ५ लक्ष नंतर NSHFDC

कर्ज मागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  • मतीमंद अर्जदाराच्या बाबतीत अर्जावर पालकांची (Legal Guardian) सही असणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला कर्ज अर्ज २/३ प्रती मध्ये खालील साक्षांकित सत्यप्रत कागदपत्रासह
  • १५ वर्ष महाराष्ट्र वास्तव्य केल्या बाबतचा दाखला/डोमीसाईल प्रमाणपत्र तहसीलदार प्रमाणित
  • वयाचा/ शाळा सोडल्याचा दाखला वयाच्या पुराव्या बाबत कागदपत्र
  • दिव्यांगत्वाचा दाखला सिव्हील सर्जन प्रमाणित
  • अनुभव प्रमाणपत्र अपव्यय जोडावा
  • निवडणूक आयोग व आधार ओळखपत्र
  • ३/२ पासपोर्ट व पूर्ण आकाराचे फोटो
  • अर्जदाराच्या नावे जमीन/ शेती असण्याबाबत चा पुरावा ( ७/१२ व ८ अ चा उतारा )
  • व्यवसाय करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थान चा नाहरकत दाखला (उदा ग़्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद) सचिव /मुख्याधिकारी द्वारा प्रमाणित
  • व्यवसाय प्रकल्प अहवाल (Project Report) व दरपत्रक (Quotation)
  • कर्जबाजारी/ वित्तसंस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र (Affidavit) १००/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर
  • पाण्याची पातळी उपलब्धतेबाबत भूजल सर्वेक्षण अहवाल दाखला (विहीर, बोअरवेल, मोटर पाईपलाईन) या करिता

वैधानिक कागदपत्रे

नमुना क्र.

१. स्थळ पाहणी

२. जमीनदार वैयक्तिक माहिती

३. पैसे दिल्याची पावती

४. डी. पी. नोट

५. प्रतिज्ञापत्र (लाभार्थींच्या नावे १००/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)

६. जमीन करारनामा (१००/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)

७. तारण करारनामा (१००/- रु. च्या स्टॅम्प पेपरवर)