युवा स्वावलंबन योजना

कर्ज मर्यादा : रुपये २५ लाख
वय मर्यादा : १८ ते २५ वर्षे
व्याज दर : रुपये ५०००० पर्यंत ५ %
रुपये ५०००० ते रुपये ५ लाख पर्यंत ६%
रुपये ५ लाखाच्यावर ८ %
महिलांना १% सुट
कर्ज परतफेड : १० वर्षे पर्यंत

कर्ज मागणी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला कर्ज मागणी अर्ज (रु.५ लाखापर्यंत २ प्रती व त्यावरील प्रकरण
    असल्यास ३ प्रती )
  • १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्याचा दाखला / डोमिसाईल सर्टीफिकेट
  • वयाचा दाखला/ शाळा सोडल्याचा दाखला/ एस.एस.सी.बोर्ड. प्रमाणपत्र/ जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणपत्र / आधारकार्ड (वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे ) यापैकी कोणतेही एक
  • सक्षम वैद्यकीय प्राधीकारांनी दिलेला दिव्यांगत्वाचा दाखला (साक्षांकित सत्यप्रत)
  • प्रस्तावित व्यवसायासंबंधींचे प्रमाणपत्र
  • निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/ समाज कल्याण ओळखपत्र /पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक
  • तीन पासपोर्ट साईज व पूर्ण आकाराचा फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र (अनिवार्य नाही )
  • अ) व्यवसायाच्या जागेच्या उपलब्धतेचा पुरावा नमुना नं.८/ करपावती/ सिटी सर्वे उतारा/ भाडेपावती
    ब) जगाधार्काचे नोटरी केलेले संमतीपत्र /भाडेकरार रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर (Affidevit/ प्रतिज्ञापत्र)
  • कुठल्याही बँकेचा अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र
  • वाहन कर्ज करिता वाहन परवाना धारकाचे पूर्ण कर्जफेड होईपर्यंत व्यवसायात मदत करण्याचे/ वाहन चालविण्याचे रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेले हमीपत्र
  • व्यवसायाचा प्रकल्प अहवाल (Project Report)
  • व्यवसायाच्या मालाचे सविस्तर दरपत्रक/ कोटेशन (दिनांकासहित)
  • पशुपालन व्यवसायासाठी पशु वैद्यकीय सेवा प्राप्त असल्याबाबतचा दाखला
  • शेतीविषयक कर्जासाठी अर्जदाराच्या नावे असणाऱ्या जमिनीचा ७/१२ चा उतारा व ८ अ चा उतारा
  • शेती व्यवसायासाठी पाण्याची पातळी उपलब्धतेबाबत भूजल सर्वेक्षण अहवाल दाखला (विहीर, बोअरवेल, मोटर, पाईपलाईन )
  • मतीमंद सेरेब्रल पाल्सी /ओटीझाम अर्जादाराकरिता जिल्हा लोकल लेव्हल कमिटी द्वारा प्रमाणित केलेला कायदेशीर पालकत्वाचा दाखला, मतीमंद व्यक्तीसह कुटुंबाचा एकत्रित फोटो ३.
  • मतीमंद अर्जदाराच्या बाबतीत अर्जावर पालकांची (Legal Guardian) सही असणे आवश्यक आहे.
  • सर्व झेरॉक्स प्रती अर्ज दाराने स्वत: साक्षांकित करणे आवश्यक आहे
  • विवाह नोंदणी दाखला/विवाहानंतर नावात बदलाबाबत प्रतिज्ञापत्र/ नावात बदलाचे गेझेट (विवाहित महिला अर्ज दारासाठी)