प्रस्तावना

"दिव्यांगांना दिव्यांगत्व हे शाप न वाटता ते वरदान वाटले पाहिजे अशा प्रकारची कामगिरी करण्यासाठी महामंडळ कटिबद्ध आहे. दिव्यांग बांधवानी आपली निराशा झटकून महामंडळाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा व "मुकम् करोति वाचालम्, पंगूम् लघयते गिरीम्" ही म्हण प्रत्यक्षात आणून दाखवावी."

फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) 

प्रस्तुत योजनेकरिता एकूण ४५,३८९ इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. दिव्यांग व्यक्तींनी ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे काम महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. यांचे स्तरावर करण्यात आले असून दिनांक १०.०६.२०१९ व दिनांक २७.०९.२०२३ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणारे म्हणजेच १००% दिव्यांगत्वाचे प्रमाण असणारे अर्जदार यांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असून सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाकरिता ६६७ दिव्यांग लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच पात्रतेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे काही दिव्यांग अर्जदारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. उर्वरित सर्व दिव्यांग अर्जदार यांचे अर्ज पुढील आर्थिक वर्ष सन २०२४-२०२५ मध्ये वर्ग करण्यात येत असल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

केवळ ज्या दिव्यांग व्यक्तींनी यापुर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत अशाच दिव्यांग व्यक्तींकरिता वर्ष २०२४-२५ अंतर्गत नोंदणी पोर्टल लोकसभा निवडणूक, २०२४ च्या आदर्श आचारसंहितेचा कालावधी पूर्ण झाल्यावर सुरु करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.