निविदा

कार्यालयीन लेखाविषयक काम व लेखा अहवाल तयार करणे या कामाकरीता निविदा

 
महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई (खोली नं. ७४, तळमजला, गृह निर्माण भवन (म्हाडा),कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई – ४०००५१) या कार्यालयास वर्ष २०२४-२५, २०२५-२६ व २०२६-२७ या तीन वर्षांकरिता कार्यालयीन लेखाविषयक काम व लेखा अहवाल तयार करणे या कामाकरीता नोंदणीकृत सनदी लेखपाल यांचे कडून निविदा/दरपत्रक मागविण्यात येत आहे.
 
तरी इच्छुकांनी खालील माहिती व अटी शर्ती पाहून आपली वैयक्तिक माहिती व दरपत्रक बंद लिफाप्यात दि. २८/०३/२०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयात वैयक्तिक रित्या अथवा विहित वेळेत प्राप्त होतील या प्रकारे कुरिअर अथवा पोस्टाने पाठवावीत. 
 
विहित दिनांक व वेळेनंतर प्राप्त दरपत्रके विचारात घेतली जाणार नाहीत.