प्रस्तावना

"दिव्यांगांना दिव्यांगत्व हे शाप न वाटता ते वरदान वाटले पाहिजे अशा प्रकारची कामगिरी करण्यासाठी महामंडळ कटिबद्ध आहे. दिव्यांग बांधवानी आपली निराशा झटकून महामंडळाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा व "मुकम् करोति वाचालम्, पंगूम् लघयते गिरीम्" ही म्हण प्रत्यक्षात आणून दाखवावी."

फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल)  - सूचना 

सन २०२४-२५ करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक १०.०६.२०१९ रोजीच्या शासन निर्णयानूसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई यांचे मार्फत सुरु आहे.

प्रस्तुत योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज करण्यासाठी) पोर्टल दिनांक २२.०१.२०२५ रोजी प्रक्षेपित करण्यात आले आहे त्या साठी दिव्यांग व्यक्तींकडून ऑनलाईन अर्ज मागविणेसाठी register.mshfdc.co.in हि लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक ०६.०२.२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे. तरी सदर योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा.

Error
  • Category not found