हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल)
सन २०१८-१९ या वर्षांपासून दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याची योजना राज्यातमहाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत राबविण्यातराज्य शासनाने मान्यता दिलेली आहे.
योजनेचा उद्देश:
१. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे.
२. दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनवर्सन करणे.
३. सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांचा परिवार / कुटूंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे.
अधिक माहिती करीता ह्या लिंक वर क्लिक करा..शासन निर्णय क्र.दिव्यांग२०१८/प्र.क्र.१२६/अ.क.२ दि. १० जून, २०१९