दिव्यांग व्यक्तींकरिता स्वतंत्र विशेष धोरणाचा मसुदा तयार करावा - सचिन अहिर

महा न्यूज
१८ सप्टेंबर २०१२
मुंबई, भारत

महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींकरिता स्वतंत्र असे विशेष धोरण असणे गरजेचे आहे. यासाठी सर्वंकष धोरणाचा मसुदा लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचना सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री सचिन अहिर यांनी संबंधितांना दिल्या.

राज्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष धोरण निर्मिती करण्याबाबत मंगळवारी विधानभवन येथे श्री.अहिर यांच्या उपस्थितीत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव आर.डी.शिंदे, दिव्यांग कल्याण आयुक्त बाजीराव जाधव, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे आदी उपस्थित होते.

दिव्यांग व्यक्तींकरिता स्वतंत्र विशेष धोरणाचा मसुदा तयार करावा - सचिन अहिर

राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तीसाठी विविध योजना, सोयी सवलती तसेच विविध कायदे अंमलात आणले आहेत. तथापि दिव्यांगाचे सर्वांगीण पुनर्वसन व्हावे व या क्षेत्रातील दुर्लक्षित दिव्यांग घटकाला विशेष न्याय देता यावा असा मानस या दिव्यांगांसाठी धोरण निर्मितीच्या मागे असल्याचे श्री.अहिर यांनी सांगितले.

शासनाचे दिव्यांग कल्याण आयुक्तालय, या क्षेत्रात कार्य करणाऱ्या राज्यातील दिव्यांग व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, दिव्यांग हक्क विकास मंच मुंबई, यशवतंराव चव्हाण प्रतिष्ठान यांनी परस्परात समन्वय ठेवून दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष धोरण निर्मितीचा मसूदा तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असेही सचिन अहिर यांनी या बैठकीत सांगितले.