दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे आज उद्घाटन

तरुण भारत
९ नोव्हेंबर २०१२
वर्धा, भारत

महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई आणि दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात सावंगी (मेघे)च्या संयुक्त विद्यमाने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र कार्यान्वित होत असून, या केंद्राचे उद्घाटन उद्या १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात सकाळी १० वाजताआयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून कुलपती खासदार दत्ता मेघे यांच्या हस्ते पुनर्वसन केंद्राचे रीतसर उद्घाटन करण्यात येईल. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रणजित कांबळे, पालकमंत्री राजेंद्र मुळक, अशोक शिदे, आमदार दादाराव केचे, आमदार नागो गाणार, आमदार मितेश भांगडिया, माजी आमदार सागर मेघे, जिप अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, नगराध्यक्ष आकाश शेंडे, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, जिल्हा शल्य चिकित्सक मिलिद सोनवणे, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने, जिल्हा समाजकल्याण अधिकारी जया राऊत शिबिरात तपासण्यात आलेल्या दिव्यांगांना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या एडीप योजनेंतर्गत आवश्यकतेनुसार जयपूर फूट, कुबड्या, कॅलिपर, श्रवणयंत्र, तीनचाकी सायकल, व्हीलचेअर आदी उपयुक्त साधनांचे वाटप करण्यात येईल, तसेच कर्जविषयक मार्गदर्शनही या शिबिरात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे, डॉ. श्रीवास्तव यांनी केले आहे.