दिव्यांग मार्गदर्शक व सहायता शिबिर

तरुण भारत
१७ नोव्हेंबर २०१२
वर्धा

दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, चंद्रपूर व सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या वतीने वरोरा येथे दिव्यांग मार्गदर्शन व सहायता शिबिर पार पडले. या शिबिरात केंद्र शासनाच्या एडीपीआय योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांना तीन चाकी सायकल, श्रवणयंत्र, कॅलिपर्स, कुबड्या, जयपूर फुट, धनादेश, कर्ज मंजुरी पत्र वितरित करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास काळे यांच्या हस्ते झाले. शिबिरात २० दिव्यांगांची तपासणी करण्यात आली. शिबिराला जिल्ह्यातून ३०० लाभार्थी उपस्थित होते.