वैयक्तिक थेट कर्ज योजना

उद्देश : मुख्यत्वे कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरु करणे.

कर्जाची कमाल मर्यादा : रुपये २0 हजार.

व्याजदर : दरसाल दरशेकडा २%

परत फेडीचा कालावधी : ३ वर्षे (मासिक/ त्रैमासिक)

उत्पन्नाची कमाल मर्यादा : १ लाखा पर्यत (उत्पन्नाचा दाखला जोडावा)

वय मर्यादा : १८ ते ५५ वर्षे

अर्जदार योग्य तो कोणताही व्यवसाय निवडू शकतो.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

१. मूळ विहित नमुन्यातील अर्ज पूर्णतया भरलेला असावा.

२. १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याबाबत दाखला /डोमिसाईल सर्टीफिकेट.

३. वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे)

४. दिव्यांगत्वाचा दाखला (साक्षांकित केलेली सत्यप्रत)

५. उत्पन्नाचा दाखला (ग्रामीण भागासाठी तलाठी/शहरी भागासाठी तहसीलदार)

६. निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत /आधार कार्ड /पॅन कार्ड किवा दिव्यांग ओळखपत्र.

७. पासपोर्ट साईज व पूर्ण आकाराचा फोटो (अर्जावर चिकटविण्यात यावेत)

८. जागेच्या उपलब्धतेचा पुरावा (जागा स्वत:ची असल्यास कर पावती, नातेवाईकाची असल्यास संमतीपत्र, भाडयाची असल्यास भाडेकरार नामा)

वैधानिक कागदपत्र

नमुना क.

१. जमीनदार वैयक्तिक माहिती

२. पैसे दिल्याची पावती

३. डि. पी. नोट

४. प्रतिज्ञा पत्र (लाभार्थींच्या नावे १००/- रु च्या स्टॅम्प पेपरवर)

५. जमीन करारनामा (१०० रु च्या स्टॅम्प पेपरवर)