मुदत कर्ज योजना (लहान व मध्यम व्यवसायासाठी)

या योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्ती कोणताही लघु उद्योग, प्रक्रिया उद्योग, वस्तू उत्पादन उद्योग, गृह उद्योग करू शकतो.

प्रकल्प मर्यादा : रुपये ५ लाखापर्यंत

व्याजदर (वार्षिक): रुपये ५०,०००/- पर्यंत ५%

रुपये ५०,०००/- वरील ६%

स्त्री लाभार्थींना १% सुट अनुज्ञेय आहे .

तसेच अंध, मुकबधीर व मतीमंद प्रवर्गासाठी व्याज दरात ०.५% टक्के सुट अनुज्ञेय आहे.

परत फेडीचा कालावधी: ५ वर्षे

लाभार्थीचा सहभाग : ५% (एक लक्षावरील कर्ज प्रकरणाकरीता)

अर्जदार योग्य तो कोणताही व्यवसाय निवडू शकतो.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

 • मूळ विहित नमुन्यातील अर्ज पूर्णतया भरलेला असावा
 • १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य असल्याबाबतचा दाखला / डोमिसाईल सर्टीफिकेट
 • वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला (वयाच्या पुराव्याबाबत कागदपत्रे)
 • दिव्यांगत्वाचा दाखला (साक्षांकित केलेली सत्यप्रत)
 • निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राची प्रत/ आधार कार्ड/ पॅन कार्ड किंवा दिव्यांग ओळखपत्र
 • पासपोर्ट साईज व पूर्ण आकारच फोटो (अर्जावर चिकटविण्यात यावेत)
 • जागेच्या उपलब्धतेचा पुरावा (जागा स्वत:ची असल्यास कर पावती, नातेवाईकांची असल्यास संमतीपत्र, भाडयाची असल्यास भाडेकरार नामा )
 • कर्जबाजारी/वित्त संस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल प्रतीज्ञापत्र (रुपये १००/- च्या स्टॅम्प पेपरवर)
 • व्यवसायाबाबत प्रकल्प अहवाल रु.३ लाख पर्यत लाभार्थ्यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित केलेला चालेल.
 • दरपत्रक
 • रुपये ३ लाख पेक्षा जास्त कर्जासाठी शासकिय सेवेत असलेल्या जामीनदाराची कागदपत्रे (पगारपत्रक, ओळखपत्र व हमीपत्र)

वैधानिक कागदपत्र

नमुना क्र.

१. स्थळपाहणी

२. जामीनदार वैयक्तिक माहिती

३. पैसे दिल्याची पावती

४. डी.पी. नोट

५. प्रतिज्ञापत्र (लाभार्थीच्या नावे १०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर)

६. जामीन करारनामा (१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर )

७. तारण करारनामा (१०० रु. च्या स्टॅम्प पेपरवर ) पशुपालन व्यवसायाकरिता नमुना क्र. १,२,३,४,५,७,९