शैक्षणिक कर्ज योजना
एच.एस.सी. नंतर स्वत: दिव्यांग असलेला शिक्षणार्थी/प्रशिक्षणार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. एच.एस.सी. नंतर नोकरी मिळण्यायोग्य असलेल्या सर्व पाठ्यक्रमाकरिता ही कर्ज सुविधा उपलब्ध आहे. सदर पाठ्यक्रम शासन मान्य असावा. या कर्ज योजनेत वसतिगृह, महाविद्यालय, प्रशिक्षण केंद्र, वाचनालय, शिकवणी, प्रयोगशाळा, बांधकाम निधी इ. शुल्क व पुस्तके, पोषाख खरेदी, शैक्षणिक यंत्र व उपकरणे खरेदी, प्रवास खर्च, संगणक खरेदी पन्नास हजार रुपयापर्यंत दुचाकी वाहन खरेदी, शैक्षणिक साहित्य व साधने खरेदी, फिल्ड वर्क, प्रोजेक्ट वर्क इ. सर्व खर्च कर्ज रक्कमेकरिता ग्राह्य धरण्यात येतात.
कर्ज मर्यादा : | देशांतर्गत रुपये १० लाख परदेशात रुपये २० लाख |
वार्षिक व्याज दर : | ४% महिलांना ३.५% |
कर्ज परतफेड : | ७ वर्षे |
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
- शैक्षणिक कर्ज अर्ज पूर्णतया भरलेला असावा. (४ प्रती मध्ये साक्षांकित करून)
- दिव्यांगत्वाचा दाखला (साक्षांकित केलेली सत्यप्रत)
- वयाचा दाखला (एच.एस.सी. टिसी)
- शैक्षणिक अर्हताचे प्रमाणपत्र
- एक पासपोर्ट साइज व एक पूर्ण आकाराचे फोटो (तीन प्रती करिता एकूण आठ)
- कोणत्याही शासकीय यंत्रणेतून वित्तीय सहाय्य घेतले नाही याबाबत १००/- रु. स्टॅम्पपेपरवर वर प्रतिज्ञापत्र
- मागील परीक्षा उत्तीर्ण झाल्या बाबतच्या गुणपत्रिका
- शिष्यवृत्ती अथवा शासनाकडून कोणतेही अर्थसाहाय्य मिळत असल्यास त्याबाबत तपशील द्यावा.
- अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्याबाबतचे प्रमाणपत्र (बोनाफाईड)
- लाभार्थ्यांचे सादर करावयाचे अभ्यासक्रमाला लागणाऱ्या खर्चाचे पत्रक
- लाभार्थींच्या वैयक्तिक बँक खात्याचे मागील सहा महिन्याचा लेखाजोखा असलेले
- बँक द्वारा प्रमाणित केलेली स्वाक्षरी पडताळणी प्रमाणपत्र.
- पासपोर्ट/मतदान ओळखपत्र/अधिवास अथवा रहिवासी दाखला (Domecile)
- पालकांचा उत्पन्नकर दाखला (मागील दोन वर्षाचा)
- उत्पन्नाबाबतचा दाखला (पगार पत्रक)
- स्थावर मालमत्ता बाबतचे विवरणपत्र (जमिनीचा ७/१२ खरेदी खत)
वैधानिक कागदपत्रे -
कर्जमंजुरी नंतर खालील प्रमाणे वैधानिक कागदपत्रांची पूर्तता जिल्हा कार्यालयात करावी लागेल.
कर्जवसुली -
कर्जवसुली चेक घेतल्यानंतर पुढील महिन्यापासून वसुली सुरु होईल. कर्जवसुलीमध्ये कसुरदार लाभार्थीवर नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.